नूतन जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांचा सांगलीत सत्कार
सांगली : खरा पंचनामा
कामेरी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षच्या वतीने नुकतेच निवडून आलेले नूतन जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांचा पाटील कुटुंबियातर्फे सत्कार संपन्न झाला. हा सत्कार सोहळा भाजप नेते व जैन प्रकोष्ठाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्या सांगली येथील स्वदेशी व्हिला या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना जयराज पाटील यांनी निवडणूक काळात श्री रावसाहेब पाटील यांनी ऐतवडे बुद्रुक परिसरात जयराज पाटील यांचे वडील श्री.सी.बी. पाटील यांच्या समवेत सभा घेऊन केलेल्या मोलाच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पाठिंब्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकीत विजय संपादन करता आला, असे त्यांनी नमूद केले.
या सत्कार समारंभाप्रसंगी श्री रावसाहेब पाटील यांनी जयराज पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या हातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील व राजकारणाचा उपयोग जनसेवेसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सौ. कांचन पाटील, सागर पाटील व हर्षद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.