Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक एक काडतूसही जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक 
एक काडतूसही जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी रस्त्यावरील वासुंबे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.

मार्तंड विठ्ठल पवार (वय ३४), सागर दिपक भोरे (वय ३३, दोघेही रा. मतकुणकी, ता. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेकायदा घातक शस्त्रे वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते. पथक तासगाव परिसरात गस्त घालत असताना पथकातील सागर टिंगरे यांना दोघेजण देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी वासुंबे फाटा येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने मणेराजुरी रस्त्यावर वासुंबे फाटा येथे सापळा रचला. तेथे दोघेही आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. ते ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सागर टिंगरे, सतिश माने, अमर नरळे, सागर लवटे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, मच्छिद्र बर्डे, संदिप गुरव, उदयसिंह माळी, महादेव नागणे, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, शिवाजी सिद, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.