Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक काळासाठी दहा सराईत गुन्हेगार ‘हद्दपार'सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

निवडणूक काळासाठी दहा सराईत गुन्हेगार ‘हद्दपार'
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या १० रेकॉर्डवरील गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मिरज तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास प्रतिबंध (हद्दपार) करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता  लागू असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान व १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी सांगली ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. त्या अंतर्गत मिरज तालुक्यातील सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व उपद्रवी व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन, त्यांच्या हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय आनंदा सुतार (नांद्रे), अनिल रघुनाथ नलवडे (कवलापूर), जयराज ऊर्फ राजाराम साळुंखे (कवठेपिरान), अक्षय दिलीप शेटे (इनामधामणी), मनोज माणिक पाटील (इनामधामणी), आशिष संजय केरीपाळे ऊर्फ पाटील (कवठेपिरान), सचिन बाबासो चव्हाण ऊर्फ डीजे (कवठेपिरान), किरण हणमंत घोडके (हरिपूर), निलेश नरसू फाकडे (हरिपूर), अमित उमाजी नाईक (कवलापूर) या दहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना  ४  ते १० फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत मिरज तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानासाठी सशर्त प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.