Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

२०४७ चे "व्हिजन ३००अब्ज डॉलर्स"अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालणारा देवभाऊंचा पायाभूत अर्थसंकल्प : राजा मानेदूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणात सहभाग

२०४७ चे "व्हिजन ३००अब्ज डॉलर्स"
अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालणारा देवभाऊंचा पायाभूत अर्थसंकल्प : राजा माने
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणात सहभाग

मुंबई : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर स्वतःच अर्थसंकल्प सादर करण्याचा इतिहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडविला. २०४७ चा भारत डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदींनी पाचशे अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था (5 ट्रिलियन इकॉनॉमी) या उद्दिष्टाला पूरक ठरणारा व राज्याला तीनशे अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा उद्देश ठेवणारा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. 
अर्थसंकल्पावर व्यापक दृष्टीक्षेप टाकणारा विधान भवन परिसरात विशेष स्टुडिओ थाटून थेट प्रसारणाचा उपक्रम मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने घेतला. 
या कार्यक्रमात संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने सहभागी झाले होते. " शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत आणि तृतीय पंथीयांपासून दिव्यांग समाज घटकांपर्यंत तसेच राज्यातील सर्व जाती-धर्मांची व लाडक्या बहिणींची काळजी वाहणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा उत्कृष्ट मेळ देवभाऊंनी घातला आहे," अशी प्रतिक्रिया राजा माने यांनी चर्चेत सहभागी होताना व्यक्त केली. 

सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम निर्माते डॉ.आलोक खोब्रागडे व दूरदर्शनच्या टीमचे माने यांनी आभार मानले. अर्थसंकल्पाच्या सर्व मुद्द्यांना स्पर्श करत संजय भुस्कुटे यांनी थेट प्रसारणाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, वर्षा माळवदे, निशिता राजे यांनी चर्चेत मोलाचे योगदान दिले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.