Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसामुळे मिळाले जीवदान सांगली ग्रामीणचे रमेश पाटील यांची समय सूचकता

कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसामुळे मिळाले जीवदान 
सांगली ग्रामीणचे रमेश पाटील यांची समय सूचकता 

सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव एका पोलिसाने दाखवलेल्या समय सूचकतेमूळे वाचला. रेस्क्यू टीमच्या मदतीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील रमेश पाटील यांनी त्याला वेळीच वाचवून सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

निखिल दिलीप सावंत (वय 23, रा. सांगोला, जि. सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समजू शकले नाही. शुक्रवारी दुपारी निखिल अंकली पुलावर पोहोचला. तेथे तो बराच वेळ थांबला होता. काही वेळाने त्याने पुलावरून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुलावरून जाणाऱ्या दोघांनी त्याला अडवले. मात्र तरीही त्याने नदीत उडी मारली.

याची माहिती अंकली फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार रमेश पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने रेस्क्यू टीमशी संपर्क साधून नदीकडे धाव घेतली. नदीत पाणी पातळी कमी होती. पाटील यांच्यासह टीमने नदीत उतरून त्याला बाहेर काढले. त्याची चौकशी करून त्याला उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अंमलदार रमेश पाटील यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे निखिलचे प्राण वाचले. त्यामुळे पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.