गहाळ झालेले नऊ लाखांचे दागिने, रोकड दोन तासात महिलेला केली परत
विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
विटा ते इचलकरंजी असा एसटी बसमधून प्रवास करताना महिलेची दागिने, रोकड असलेली बॅग विश्रामबाग पोलिसांनी दोन तासात शोधून महिलेला परत केली. तब्बल नऊ लाखांचा ऐवज परत मिळाल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह त्यांच्या टीमचे आभार मानले.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात डायल ११२ वरती दुपारी दीडच्या सुमारास कॉल आला की, कॉग्रेस भवन समोरील हॉटेलजवळ बेरवारस बैंग आहे. पोलिसांनी तेथे जावुन खात्री केली असता एक बेवारस बॅग सापडली. बॅग ही पोलीस ठाण्यात आणुन बॅगच्या डाव्या बाजुच्या कप्पा पाहिला असता त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड व बैंक पासबुकची झेरॉक्स मिळुन आले व त्यामध्ये एक मोबाईल सापडला. तसेच संगिता मारुती जाधव यांचे पासबुक झेरॉक्स मिळुन आले त्यावरती मारुती जाधव यांचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावर पोलिसांनी संपर्क करून मारुती जाधव यांना राखाडी रंगाची बॅग सापडल्याचे सांगितले. त्यावर जाधव यांनी ती बॅग माझी पत्नी संगिता जाधव याची असुन ती विटयाहुन इचलकरंजीला मुलीकडे गेली होती. मी त्यांना व जावई चेतन घाडगे यांना विश्रामबाग पोलीस ठाणे येथे पाठवतो असे सांगितले.
जाधव पोलीस ठाण्यात आल्यावर सदर बँगेस लावलेल्या कुलुपाची किल्ली ही संगिता जाधव यांच्याकडे होती ते कुलुप संगिता जाधव यांच्यासमक्ष उघडले असता त्यामध्ये संगिता जाधव यांच्या बॅगेत ६ तोळे सोन्याचे गंठन व ६१५० रुपये रोख सापडले. व इतर साहित्य बॅगेत असल्याची खात्री केली असता त्यांनी माझे सर्व साहित्य हे बॅगेत असल्याचे सांगितले. तरी सदर बैंग व बॅगेत असले सोन्याचे गंठन व रोख रक्कम बॅगेसह संगीता जाधव व त्यांचे जावाई चेतन घाडगे यांना पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सुस्थितीत त्यांच्या ताब्यात दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.