Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील खूनासह मोक्याच्या गुन्हयातील परागंदा संशयितास अटकसांगली एलसीबीची कारवाई

मिरजेतील खूनासह मोक्याच्या गुन्हयातील परागंदा संशयितास अटक
सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरजेतील निखिल कलगुटगी याच्या खून प्रकरणात तसेच मोक्याच्या गुन्ह्यात पसार असलेल्या संशयितास अटक करण्यात आली. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

महमदशिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे (वय २६, रा. पाटील हौद, ब्राम्हणपूरी, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 29 सप्टेंबर  2025 रोजी निखिल कलगुटगी याचा मिरजेत खून करण्यात आला होता. याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनातील संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना घडल्यापासून आगलावणे हा पसार होता. त्याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते.

पथक मिरज शहरात गस्त घालत होते. त्यावेळी आगलावणे हा मिरज ते म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यांनी तेथे पथकासह सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अतुल माने, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी, शांता कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.