राज्यसभेसाठी काँग्रेसकडून यादी जाहीर, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह 'या'बड्या नेत्यांना संधी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह यादीत अनेक मोठ्या अनुभवी नेत्यांची नावे आहेत.
काँग्रेसकडून तेलंगणा येथून दोन नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. सिंघवी राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.
तेलंगणामधून दुसरे नाव आहे नरेंद्र रेड्डी. नरेंद्र रेड्डी हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांशी असलेली त्यांची जवळीक आणि पक्षाच्या संघटना बांधणीासाठी या निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन्ही उमेदवारांची विजय निश्चित मानला जातो.
छत्तीसगढमधून फूलो देवी नेताम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षातील अनुभवी नेत्या आणि राज्यातील आदिवासी समाजातील वजनदार नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसला आदिवासी व्होट बँक मजबूत करण्यास मदत होईल, असे म्हटले जाते.
हरियाणा येथून करमवीर सिंह बौद्ध यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. दलित समाजाचे नेतृत्व करणारे करमवीर सिंह बौद्ध सध्या पक्षाला संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी सक्रीय आहेत. दुसरे नाव अनुराग शर्मा यांचे आहे. युवा चेहरा म्हणून पक्षाने त्यांची निवड केली आहे. राज्याच्या राजकारणात राजनीती आखण्यात अनुराग शर्मा यांचे विशेष योगदान आहे.
तामिलनाडू येथून एम. क्रिस्टोफर तिलक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात पक्ष वाढविण्यासाठी त्याचे योगदान मोठे आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी त्यांचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.