शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार जाणार राज्यसभेवर
मुंबई : खरा पंचनामा
भाजपने पूर्वीच त्यांचे चार उमेदवार जाहीर केले होते. राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवार, ५ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे उघड केली आहेत.
महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपने बुधवारी आपले चार उमेदवार जाहीर केले होते. यानंतर महायुतीतील उर्वरित दोन पक्षांमधून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेकडून मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. जुन्या चेहऱ्यांना संधी न देता नव्या चेहऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर भाजपने चार उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे आणि शायना एन.सी. या चार नावांवर चर्चा सुरू होती. यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र अखेर पक्षाने ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान पार पडणार असून यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.