Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी सांगलीत ६४ टक्के तर जिल्ह्यात ६८ टक्के मतदान

सांगलीत महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी सांगलीत ६४ टक्के तर जिल्ह्यात ६८ टक्के मतदान 

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीसह जिल्ह्यात महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठीची मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. एकूण २३ जागांसाठी हे मतदान पार पडले. सांगली शहरात ६४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महाराष्ट्र आणि गोवा येथील एकूण १५५ वकील उमेदवार रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यातून ह्या निवडणुकीसाठी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड.  प्रमोद भोकरे व ॲड. अमोल चिमाण्णा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

सर्व भागातून ज्येष्ठ वकिलांसह नवोदित स्त्री, पुरुष वकीलवर्गातून कमालीचा उत्साह होता. निवडणुक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकीलांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला.  सांगली जिल्ह्यात एकूण ३७०१ वकील मतदार होते या पैकी सांगली येथे ११३२ मतदारांपैकी ७२९, तर मिरज ५२९, ईश्वरपूर ३४८, शिराळा ६७, विटा २६०, तासगाव १४०, कवठेमहांकाळ ७३, जत १००, पलूस १०० वकीलांनी मतदानाचा हक्क बजावला.  

मतदान प्रक्रियेदरम्यान सांगली जिल्हा न्यायालयातील मतदान केंद्रावर दिवसभर वकिलांची गर्दी दिसून येत होती. ९२ वर्षाचे ज्येष्ठ वकील ॲड. नाबू पाचोरे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर सर्किट बेंचचा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे यावेळी सहा जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये मतदानासंदर्भात मोठी जागरूकता दिसून आली. मतमोजणीस १ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया सुमारे एक ते दीड महिना चालण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.