Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राम नवमीसह आगामी सण, उत्सव, यात्रांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रोखण्याचे नियोजन करा कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सांगलीतील बैठकीत सूचना गंभीर गुन्ह्यातील संशयित निर्दोष सुटत असल्याच्या बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्याचेही आदेश

राम नवमीसह आगामी सण, उत्सव, यात्रांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रोखण्याचे नियोजन करा 
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सांगलीतील बैठकीत सूचना 
गंभीर गुन्ह्यातील संशयित निर्दोष सुटत असल्याच्या बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्याचेही आदेश 

सांगली : खरा पंचनामा 

राम नवमीसह, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासह अन्य सण, उत्सव, स्थानिक जत्रा, यात्रा यांच्या पार्श्वभूमीवर योग्य तो बंदोबस्त ठेवून यातील गुन्हे रोखण्यासाठी नियोजन करा. तसेच गंभीर गुन्ह्यातील संशयित निर्दोष सुटण्याचे प्रमाण सांगली जिल्ह्यात खूप आहे. या खटल्यांचा अभ्यास करून त्रुटी दूर करण्याबाबत तपासी अधिकारी, अंमलदार यांची कार्यशाळा घेण्याचे आदेश कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले.

सांगलीत बुधवारी महानिरीक्षक फुलारी यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत महानिरीक्षक फुलारी यांनी प्रलंबीत गुन्हे तसेच चौकशी अर्ज निपटारा, गुन्ह्यांची निर्गती याबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आगामी सण, उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर महिलांबाबत होणारे गुन्हे रोखण्याच्या सूचना दिल्या. त्याशिवाय यात्रा, जत्रांमध्ये होणारे गुन्हे रोखण्यासाठी नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या.

विविध गुन्ह्यांचा तपास तातडीने करून संबंधितांचा मुद्देमाल तातडीने परत करण्याची कार्यवाही करावी. पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयात जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तक्रारी अर्ज वेळेत निकाली काढावेत, पूर्ण चौकशी करून दाखल केलेल्या गुन्ह्यांचा निपटारा करावा अशा सूचनाही महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी दिल्या.

सांगली जिल्ह्यात 2025 या वर्षात तब्बल तीन हजार गुन्ह्यातील संशयित निर्दोष सुटले आहेत. त्या खटल्यांचा अभ्यास करून गुन्हेगार निर्दोष सुटू नयेत यासाठी तपासी अधिकारी, अंमलदार यांची कार्यशाळा घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच यासाठी सरकारी वकीलांशी योग्य तो समन्वय साधून गुन्हेगार निर्दोष सुटू नयेत यासाठी परिपूर्ण तपास करून, पुराव्याचे व्यवस्थित जतन करून आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही महानिरीक्षक फुलारी यांनी या बैठकीत दिल्या. अवैध व्यवसायाबाबतही त्यांनी यावेळी झाडाझडती घेतली.

यावेळी सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, मिरजेचे उपविभागीय अधिकारी प्रणिल गिलडा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.