Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भारतीय सुरक्षा दलांचे नेतृत्व कोणाकडे? CAPF विरुद्ध IPS वाद आता थेट संसदेत

भारतीय सुरक्षा दलांचे नेतृत्व कोणाकडे? 
CAPF विरुद्ध IPS वाद आता थेट संसदेत

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

कल्पना करा की, गेली ३०-३५ वर्षे तुम्ही देशाच्या सीमेवर तैनात आहात, नक्षलवाद्यांशी लढता, दंगली नियंत्रणात ठेवता; पण १६ वर्षांपर्यंत तुम्हाला एकही बढती मिळत नाही. आणि जेव्हा सर्वोच्चपदाची वेळ येते, तेव्हा ते पद अशा अधिकाऱ्याला दिले जाते, ज्याने तुमच्या दलात कधी कामच केलेले नाही. ही केवळ भावनात्मक निराशेशी संबंधित घटना नाही, तर भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतील (CAPFs) अधिकाऱ्यांची दीर्घकाळाची वेदना आहे. आणि याच वेदनेतून CAPF विरुद्ध IPS असा एक मोठा संस्थात्मक संघर्ष उभा राहिला असून आता २०२६ साली तो थेट संसदेत पोहोचला आहे.

या घटनाक्रमाबाबत आणखी एक युक्तिवाद सरकार दरबारी केला जातो. CAPFs स्वतंत्रपणे काम करत नाहीत. त्यांना राज्य पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधावा लागतो. भारतीय पोलीस सेवेतले (IPS) अधिकारी राज्यांमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना हा समन्वय साधण्याचा अनुभव असतो, तोच राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो, असा हा सरकारचा युक्तिवाद आहे. या दोन मुद्द्यांवर गेल्या अनेक दशकांपासून जोरदार वाद सुरू असून आता तो टिपेला पोहोचला आहे.

व्यवस्थेमुळे CAPFs मधील सर्वोच्च पदांवर IPS अधिकाऱ्यांचेच वर्चस्व निर्माण झाले आहे. काही दलांमध्ये डायरेक्टर जनरल (DG) अर्थात महासंचालक हे पद पूर्णपणे IPS अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे. याचा परिणाम असा की, CAPF मधील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे चांगले काम करूनही उच्च पदांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत.

CAPF अधिकाऱ्यांची मुख्य तक्रार अशी आहे की, अनेक IPS अधिकारी जेव्हा वरिष्ठ पदांवर येतात, तेव्हा त्यांना त्या दलाचा प्रत्यक्ष अनुभवच नसतो. काही वेळा असेही लक्षात आले आहे की, एखादा IPS अधिकारी दलात एक दिवसही काम न करता थेट सर्वोच्च पदावर नियुक्त होतो. त्यानंतर त्या दलाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी त्यांना महिने लागतात. याउलट, CAPF अधिकारी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असतात. सीमांवर, जंगलात तसेच इतरत्र प्रत्यक्ष संघर्ष क्षेत्रात. म्हणूनच CAPF अधिकारी म्हणतात की, "ज्यांनी प्रत्यक्ष रणांगण पाहिले, त्यांनाच नेतृत्वाची संधी मिळायला हवी."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.