Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पेपरफुटी प्रकरणात आरोपीच देणार साक्ष, शिपाई अटकेत

पेपरफुटी प्रकरणात आरोपीच देणार साक्ष, शिपाई अटकेत

नागपूर : खरा पंचनामा 

नागपूरमधील बारावीच्या पेपर फुटीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात पेपर फोडणारे हात चपराश्याचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर चपराश्याच्या मदतीनेच आरोपी संदीप सरटकर याने पेपर फोडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश आडे (वय ३५) या चपराश्याला ताब्यात घेतले आहे.

तर आता या प्रकरणात कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांबरोबर चपराश्याचा समावेश असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आधीच आठ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या पेपरफुटीत मोठं रॅकेट उघड होण्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बारावी पेपरफुटी तपासात नवा धक्कादायक खुलासा समोर आला होता. बारावीचे दोन नव्हे तर तीन पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर राज्य परीक्षा बोर्डाकडून तपास सुरू झाला होता. याला राज्य परीक्षा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. तर तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून केंद्रावर चपराश्याच्या मदतीनेच पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफाच्या चौकशीत उघड झालेली माहिती अशी की, अविनाश आडे (वय ३५) या चपराश्याच्या मदतीनेच पेपर फोडला होता. तर व्हॉट्सअॅपवर गणिताचा पेपर पाठवला होता. मुस्तफा याच्या शिकवणी वर्गात शिक्षक असलेला अल्ताफ गोडील याने परिचयात असलेला दिनेश कोटांगळे याला बारावीच्या विज्ञान शाखेतील विषयांचे पेपर मागितले. त्याने 'एज्युकेशन अॅकॅडमी'चे संचालक मनीष शंभरकर याच्या माध्यमातून प्रदीप जांगडे याची भेट घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रदीप मुख्याध्यापक असल्याने त्याला संपर्क केला. त्यानंतर प्रदीपने दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफला कॉल करून बोलावून घेतले. याभेटीत त्याला प्रश्न आणि एमसीक्यू दिले.

यानंतर २१ तारखेला त्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आणि त्याची उत्तरेही पाठविली. प्रदीपने ही प्रश्नपत्रिका आणि उत्तर प्राथमिक शिक्षक असलेला संदीप सरटकर याच्याकडून घेतल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. संदीपची चौकशी केली असता, त्याने चपराशी अविनाश आडे याची माहिती उघड झाली. यानंतर आता पोलिसांनी अविनाश आडे याला ताब्यात घेतले असून आणखी काही जणांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.