मुंबईहून दुबईला निघालेल्या विमानाने घेतला हवेतच 'डबल रिवर्स'
मुंबई : खरा पंचनामा
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात एक विमान थोडक्यात दुर्घटनाग्रस्ता होण्यापासून वाचलंय. मुंबईहून विमान दुबईच्या दिशेनं जात होतं.
दुबईपासून जवळ असतानाच अचानक विमानाला मिसाइल अलर्ट आला. यामुळे विमानला दुबईच्या एअरस्पेसमध्ये घिरट्या माराव्या लागल्या. मिसाइल अलर्ट मिळाल्यानंतर काही काळ विमान हवेतच घिरट्या मारत होतं. एमिरेट्सचं हे विमान मुंबईहून दुबईला निघालं होतं.
एमिरेट्सचं विमान मंगळवारी सकाळी युएईच्या एअरस्पेसबाहेर थांबवण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाने अलर्ट पाठवला की, देशाची एअर डिफेन्स सिस्टिम इराणकडून लाँच केलेल्या बॅलेस्टिक मिसाइलला प्रत्युत्तर देतेय. त्यामुळे विमानाला धोक्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
अलर्ट मिळताच दुबईत उतरण्याआधी विमानाने हवेत दोन घिरट्या मारल्या. लँडिंगआधी डबल रिव्हर्स करताना लाइव्ह ट्रॅकरवर दिसून आलंय. असा प्रकार खूप दुर्मिळ मानला जातो. विमान आधी मुंबईला परत जाताना दिसलं. पण अधिकाऱ्यांकडून थांबवण्याआधी पुन्हा दुबईच्या दिशेनं जायला लागलं.
इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांकडून पश्चिम आशियातील निवडक शहरांसाठी नियमित आणि विशेष उड्डाणांची घोषणा केलीय. खासगी विमान कंपन्यांनी येत्या काही दिवसांसाठी युएईतील फूजैराह ते दिल्ली आणि कोचीसाठी एक एक विमान तर मुंबईसाठी दोन विमानांचे उड्डाण केले जाईल असं सांगितलंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.