Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

मुंबई : खरा पंचनामा 

मंत्री नरहरी झिरवळ हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यालयातील लिपिकाने लाच घेतल्याचे प्रकरणावर पडदा पडत नाही तोच एका कथित व्हायरल व्हिडिओने त्यांचे राजकीय करिअरच पणाला लागले.

याप्रकरणी झिरवळ यांनी सर्व आरोप फेटाळले. तृतीयपंथी पवन यादव हा या व्हिडिओत मंत्र्यांसोबत दिसत आहे. या चित्रफितीने समाज माध्यमांवर विविध चर्चांना ऊत आला होता. प्रकरणात मुंबईतील कफ परेड पोलिसांनी पहिली थेट कारवाई केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर त्याच्या भावाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी तो एडिट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याआधारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याची तक्रार आहे. त्याआधारे पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FDA मध्ये नोकरी लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी पवनाला देण्यात आली होती. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या इतर जणांवर सुद्धा हा गुन्हा दाखल होणार का? ही चर्चा रंगली आहे.

व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण तो आताच बाहेर काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना चेकमेट करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे.

महायुतीतील सत्तेचा सुकाणू आपल्या हाती राहावा यासाठी अशी प्रकरणं समोर आणली जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या व्हिडिओत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ दिसत आहेत. तृतीयपंथी पवन यादव हा त्यांच्या आजूबाजूला वावरताना दिसतो. त्याठिकाणी खाद्य पदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.