Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच फरकाने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलंनामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा

अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच फरकाने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं
नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा

मुंबई : खरा पंचनामा 

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास पोलीस करत असतानाच आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी 2012 साली लिहिलेल्या 'असा मी नामकर्ण' या आत्मचरित्रातील एका लेखामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकात खरात याने 1999 च्या निवडणुकीबाबत वर्तवलेली भविष्यवाणी आणि दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचा थरार शब्दबद्ध करण्यात आला आहे.

नामकर्ण आवारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्रात पान नंबर 182 ते 194 दरम्यान 'सिद्ध पुरुषांच्या सहवासात' या शीर्षकाखाली अशोक खरातचा उल्लेख आहे. खरातच्या पहिल्या भेटीपासूनचा संपूर्ण प्रवास यात विस्तारून मांडला आहे.

पुस्तकातील दाव्यानुसार, तत्कालीन उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचे काम नामकर्ण आवारे करत होते. त्यावेळी प्रचारादरम्यान वाद झाल्याने सिन्नर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेले असताना अशोक खरात त्यांना पहिल्यांदा भेटला. त्यावेळी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर अशोक खरातने स्वतःहून माझ्यासह इतर पाच सहा जणांना तुम्ही कोकाटेचे कार्यकर्ते आहात का? असा प्रश्न केला.

त्याचवेळी काही काळजी करू नका. माणिकराव साधारण 23 हजार 450 मतांनी निवडून येतील, असं भविष्य आम्हाला सांगितलं. मात्र, विजयाचा जल्लोष करता येणार नाही. कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू होईल, असे भाकीत देखील अशोक खरातने वर्तविले.

यावेळी अशोक खरात याने आम्हाला सांगितलेल्या गोष्टी आम्ही लिहून घेतल्या व माणिकराव कोकाटे यांना देखील सांगितल्या. त्यानंतर मतदान पार पडले आणि महिन्याभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे खरात यांना केलेल्या भविष्यवाणी प्रमाणेच 23, 450 मतांनी निवडून आले, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडून खरातने सांगितल्याप्रमाणे दोन कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याचा देखील उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.