टी२० विश्वचषकानंतर राडा; अकोल्यात दगडफेक, सोलापूर-सांगलीत पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबई : खरा पंचनामा
न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकावर नाव कोरले. संजू सॅमसन, इशान किशन यांची वादळी फलंदाजी, जसप्रीत बुमराह अक्षर पटेल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव केला.
संजू सॅमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर भेदक मारा करणाऱ्या बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारताच्या विजयानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष साजरा केला. पण याच जल्लोषात अनेक ठिकाणी गालबोट लागले. अकोला, सोलापूर आणि सांगलीमध्ये जल्लोष करताना राडा झाला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
अकोल्यातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन समुदायात जोरदार राडा झालाय. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. भारत टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचा सामना जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटांत झालेल्या वादा नंतर हा राडा झाला. रात्रीच्या वेळी दोन समुदाय एकमेकांसमोर आलेय. अडीच वर्षांपूर्वी या भागात दोनदा दंगल झाली. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झालाय. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यात दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. याचे cctv व्हिडिओ देखील समोर आलेत.
भारताच्या टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार करण्यात आला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी नागरिक जमले होते. यावेळी जल्लोषा दरम्यान काही जणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पिटाळून लावले. जल्लोष करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु काही जणांच्या हुल्लबाजीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावयास लागला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रेशन करताना अमरावतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी केली... अमरावतीच्या राजकमल चौकात काही तरुणांनी अंगावर फटाके फेकत जल्लोष साजरा केला होता... यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली... सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय...
सोलापुरात विश्वचषकाचा विजयोत्सवानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. अहमदाबादमध्ये भारताने टी२० विश्वषकावर नाव कोरल्यानंतर सोलापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. मात्र हुल्लडबाज तरुणांकडून गर्दीत फटाके फोडल्याने पोलिसांनी खुल्लडबाजांना हुसकावले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.