Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ आयएएस अधिकारी, सांगलीच्या कन्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्तीइतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

वरिष्ठ आयएएस अधिकारी, सांगलीच्या कन्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि सांगलीच्या कन्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केल्याची माहिती आहे.

विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यांच्या जागी नवीन आयुक्त कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या पदासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती निश्चित झाल्याची माहिती दिली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती. मात्र, शेवटी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांकडून वेगवान आणि प्रभावी निर्णयक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यामुळे महापालिकेच्या कामकाजात गती येईल, असेही म्हटले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या प्रशासकीय अनुभवासाठी आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भिडे या सरकारमधील सर्वात विश्वासू आणि खंबीर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जवळच्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक राहिल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून काम पाहिले, जिथे त्यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून, अश्विनी भिडे यांनी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) प्रशासकीय संचालकपदही अश्विनी भिडे यांनी सांभाळले. त्यानंतर अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार स्वीकारून मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई येथेही कार्यरत होत्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.