Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 201 सहायक पोलीस निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती कोल्हापूरचे 7, पुणे ग्रामीणचे 4, सांगलीचे 2 तर सातारा, सोलापूर ग्रामीणच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश

राज्यातील 201 सहायक पोलीस निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती 
कोल्हापूरचे 7, पुणे ग्रामीणचे 4, सांगलीचे 2 तर सातारा, सोलापूर ग्रामीणच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 201 सहायक पोलीस निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचे 7, पुणे ग्रामीणचे 4, सांगलीचे 2 तर सातारा, सोलापूर ग्रामीणच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

दिनांक २५.०५.२००४ नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालय यांनी रिट याचिकाक्र. २७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयान्वये पदोन्नती मधील आरक्षण अवैध ठरविले आहे. त्यामुळे मयांदित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस उप निरीक्षक पदावर खुल्या प्रवर्गातून निवड होऊन दि. २५.०५.२००४ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिका-यांचा त्यांच्या पोलीस उप निरीक्षक पदावरील सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीसाठी विचार करण्यात आला आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

पदोन्नती मिळालेले अधिकारी :
कोल्हापूर : शीतलकुमार कोल्हाळ, दिगंबर गायकवाड, दीपक जाधव, कैलास कोडग, अण्णासाहेब बाबर, सरिता लायकर, नागेश यमगर.

पुणे ग्रामीण : सचिन लोखंडे, प्रशांत आवारे, दीपक कारंडे, सुनिल बडगुजर.

सांगली : सागर गोडे, जयदीप कळेकर 

सोलापूर ग्रामीण : सागर कुंजीर 
सातारा : तबसुम शादीवान 

बीड जिल्ह्यातील नारायण एकशिंगे यांनाही पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी उपनिरीक्षक असताना सांगली एलसीबी, विश्रामबाग पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.