Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडून, ठोकून काढू!पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा कडक इशारा पहा व्हिडीओ

रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडून, ठोकून काढू!
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा कडक इशारा 
पहा व्हिडीओ 

सांगली : खरा पंचनामा 

खून, खुनी हल्ल्या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्याची विविध कारणे आहेत. मात्र हे रोखण्याचे काम पोलिस दलाचेच आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडून, ठोकून काढू, असा कडक इशारा नुतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. 


अधीक्षक दोशी म्हणाले,‘‘सांगलीचा पदभार स्विकारल्यानंतर गेल्या पाच वर्षातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यात खून, खुनी हल्ला सारख्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हे मान्य करावेच लागले. सातारा येथे वर्षात ३३ खून होता. तर तेवढ्याच लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या सांगलीत मात्र ६३ खून होता. हे चित्र धक्कादायक आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिस रस्त्यावर उतरतील. विशेषतः सांगली आणि मिरज शहरात हा ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात येईल. 

पुढील टप्प्यात जिल्ह्यातील अन्य शहरात हाच ॲक्शन प्लॅन राबवला जाणार आहे.’’ ते म्हणाले, ‘‘नशामुक्त जिल्हा करण्याचेही मोठे आव्हान आहे. शहरातील डार्क स्पॉटवर पोलिसांची गस्त सुरू होईल. रात्री उशीरापर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे. त्याचे नियंत्रण उपाधीक्षक स्तरावर केले गेले आहे. कायद्याचा धाक निर्माण करणे पोलिसांचे काम आहे. ते येणाऱ्या काही दिवसांत दिसून येईल. शहरातील सीसीटीव्ही यंत्रण सक्षम करण्यासाठी महापालिकेकडे निधीसाठी पुठपुरावा केला जाईल. त्यातून गुन्हेगारी रोखण्यातही मदत होईल. 

अपघाती मृत्यूंची संख्या दहा टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ठ आम्ही ठेवले आहे. येणाऱ्या वर्षात त्यासाठी योग्य त्या उपाययोजना आणि जनजागृती केली जाईल. वाहतूक शाखेच्या पोलिसांना तशा सूचनाही देण्यात येणार आहेत, असेही अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.