Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला आरक्षणाचा इतका कळवळा आला तर मग मंत्रिमंडळात किती महिला मंत्री?

महिला आरक्षणाचा इतका कळवळा आला तर मग मंत्रिमंडळात किती महिला मंत्री?

मुंबई : खरा पंचनामा 

नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक लोकसभेत चर्चेनंतर आपटले. विरोधकांच्या अभूतपूर्व एकजुटीने हे बिल पडले. ते नामंजूर झाले. त्यानंतर भाजपने देशभरात काँग्रेससह विरोधी पक्षांना टार्गेट करणे सुरू केले आहे.

जे बिल 2023 मध्येच मंजूर झाले, ते पुन्हा का आणले असा सवाल काँग्रेस करत आहे. हे विधेयक आणण्यामागे भाजपचा वेगळाच डाव असल्याचा आरोप विरोध करत आहे. तर विरोधकांवर भाजपकडून सडकून टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नेमका हाच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर अचूक निशाणा साधला आहे. त्यांच्या एका ट्वीटने सरकारच्या दाव्यातील हवाच काढल्याचे म्हटले जात आहे.
मी माता, भगिनींची माफी मागतो हे महिला विधेयक मंजूर होऊ शकले नाही, अशी भावनिक साद काल पंतप्रधान मोदींनी घातली. महिला आरक्षणाला विरोध करून पाप केल्याची शिक्षा विरोधकांना मिळणार असा इशाराही त्यांनी केला दिला. काँग्रेस, डीएमसी, टीएमसी आणि समाजवादी दलांनी राजकारण केलं. नारी शक्ती विधेयक पाडलं. तेव्हा त्यांना आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यांची ही कृती महिलांचा स्वाभिमान, आत्मसन्मान यावर घाला होता. महिला आपला अपमान कधी विसरत नाहीत, प्रत्येक महिलेच्या मनात ही सल कायम राहील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ही लाजिरवाणी बाब असून महिला सशक्तीकरण ही आमच्यासाठी बांधिलकी असल्याचे ते म्हणाले. विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे फडणवीस म्हणाले. देशाने विरोधकांची नौंटकी पाहिली. या विधेयकाला विरोध करून ते नेमकं कोणाच्या हितासाठी काम करता हे स्पष्ट झालं, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या दाव्यातील हवाच काढली. महिला आरक्षणाचा इतका कळवळा आला तर मग मंत्रिमंडळात किती महिला मंत्री आहेत, असा रोकडा सवाल टाकत त्यांनी सत्ताधाऱ्यांना तोंडघशी पाडले आहे.

"विरोधी पक्ष बँड वाजवून डांस करावा. हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजप ने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये, फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह ! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३% (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डांस करेल.' असे ट्वीट त्यांनी केले. या ट्वीटमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.