Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

धुळे : खरा पंचनामा 

धुळे शहरात एका १८ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ती घराबाहेर पडतानाचे आणि त्यानंतरचे काही क्षण सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्या दृश्यांमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

धुळे जिल्ह्यातील सरकारी दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथे राहणारी संजीवनी राहुल वराडे ही १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडताना दिसते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती वारंवार आजूबाजूला पाहताना दिसते. तिच्या हालचालींवरून ती चिंताग्रस्त आणि घाबरलेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

थोड्याच वेळात एक वृद्ध व्यक्ती तिच्या जवळून जाताना दिसते. त्यानंतर संजीवनीच्या हालचाली अचानक बदलतात. ती अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत उचललेला दिसतो, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे, अशी भावना निर्माण होते. या दृश्यामुळे परिसरात विविध तर्क-वितर्वांना उधाण आले आहे.

या घटनेनंतर काहीजणांनी 'हिप्नोसिस' द्वारे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, संजीवनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, तिचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटना घडल्यामुळे या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.