महाराष्ट्र राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत सांगलीची भार्गवी भोसले उपविजेती
सांगली : खरा पंचनामा
मुंबई येथे ११ ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीच्या भार्गवी भोसले हिने दहा वर्षाखालील मुलींच्या गटात उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, धुळे, बीड, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भार्गवीने धुळेच्या निधी पाटील हिचा ६-३ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात मात्र तिला मुंबईच्या ज्ञानवी शिवमठ हिच्याकडून ४-०, ४-२ असा पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेचे आयोजन सुहाना टेनिस सर्किट यांच्या प्रायोजकत्वाखाली करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळा टूर्नामेंट डायरेक्टर मनोज वैद्य यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा निरीक्षक रश्मी चौहान उपस्थित होत्या.
भार्गवी ही विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये चौथीत शिक्षण घेत असून ती आमराई ऑफिसर्स क्लब येथील श्रेया पै टेनिस अकॅडमीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक रविंद्र कदम, सोनू तोडू, दत्ता पै व निलेश बाबर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच प्रसाद जगताप फाउंडेशनकडूनही तिला सहकार्य मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.