बच्चू कडू आता शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानपरिषदेवरील रिक्त होणाऱ्या ९ जागा आणि एका जागेवर पोटनिवडणूक असा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जागांवर आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
आता या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहार क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांची गुपचूप भेट घडून आली होती. या भेटीत आता शिवसेने या पक्षातून कडू यांना थेट विधानपरिषदेची ऑफर दिली गेली आहे, असे खुद्द कडू यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची मुंबईमध्ये गुपचूप भेट घडून आली होती. या भेटीतच त्यांची शिंदे यांच्यासोबत विधानपरिषदेच्या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे, असे कडू यांनी सांगितले. संख्याबळानुसार शिवसेनेचे विधानपरिषदेवर आताच्या स्थितीमध्ये दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यातल्या एका जागेवर शिवसेनेने कडू यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे, असे दिसून येते.
बच्चू कडू हे काही वर्ष अपक्ष आमदार राहिले. त्यांनतर त्यांनी प्रहार क्रांती संघटना अशा नावाची राजकीय पक्षाची नोंदणी केली. मात्र त्यांच्या राजकारणाची सुरुवात मात्र शिवसैनिक म्हणून झाली होती. सुरुवातीच्या काळात ते शिवसेनेचे नेते राहिलेले आहेत. जुना लढाऊ शिवसैनिक अशी त्यांची आजही ओळख सांगितली जाते. त्यामुळे पूर्वाश्रमीचा शिवसैनिकच शिवसेना या पक्षाच्या कोट्यातून विधान परिषदेवर जात असल्याची भावना, त्यांचे समर्थक -कार्यकर्त्यांमध्ये असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.