दक्षता समितीतील महिलांना फोन करत गैरवर्तन भोवले : एपीआयसह हवालदार निलंबित
रायगड : खरा पंचनामा
राज्यात एकीकडे भोंदूबाबांनी कहर केला आहे. तर दुसरीकडे टीसीएस सारख्या संस्थेमध्ये महिला अत्याचाऱ्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच जनतेचं रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत महिला दक्षात समितीच्या सदस्यांना फोन करून गैरवर्तन केल्याचा प्रकार रायगडमधील पेणमध्ये उघडकीस झाला आहे. या प्रकरणी हवालदारासह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आलं आहे.
रायगडमधील पेण पोलीस ठाण्यातील एका गंभीर गैरवर्तन प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मद्यपानाच्या नशेत महिला दक्षता समितीच्या सदस्येशी मोबाईलवरून गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून हवालदार प्रकाश कोकरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना निलंबित करण्यात आलं आहे.
२१ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. प्राथमिक चौकशीत, मद्यपान करून कोणतेही शासकीय काम नसताना वारंवार कॉल करून गैरहेतूने संभाषण करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे नमूद करत शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकाराची तक्रार संबंधित महिलेनं पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात हवालदार प्रकाश कोकरे यांना रायगड अलिबाग येथील नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.