Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर सरकार नमले; सरकारी कर्मचारी संघटनांच्या लढ्याला यश, सोमवारपासून कार्यालये होणार सुरु

अखेर सरकार नमले; सरकारी कर्मचारी संघटनांच्या लढ्याला यश, सोमवारपासून कार्यालये होणार सुरु 

मुंबई : खरा पंचनामा 

चार दिवस राज्यभर खळबळ उडवणारा सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 21 एप्रिलपासून पुकारलेला संप आता मागे घेतला असून शनिवारपासून आरोग्य विभाग, तर सोमवारपासून सर्व शासकीय कार्यालये पुन्हा सुरू होणार आहेत.

मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकारने काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी... सर्वात मोठा मुद्दा -पेन्शनवर सरकारने 15 दिवसांत अधिसूचना काढण्याचं आश्वासन दिलं. यामुळेच संप मागे घेण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

मान्य झालेल्या मागण्या : 
दर 3 महिन्यांनी मुख्य सचिवांकडे बैठक
चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक भरतीला गती
आरोग्य विमा योजनेचा विचार

समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर आणि अध्यक्ष अशोक दगडे यांनी संप स्थगित करण्याची घोषणा केली. सरकारने लेखी आश्वासन दिलं, पेन्शनवर सकारात्मक भूमिका घेतली असे सांगत हा निर्णय घेतला गेला, असे सांगण्यात आले. पण... काही कर्मचारी वर्गात अजूनही नाराजी आहे. "लढा अर्धवट सोडला" अशी टीका करण्यात येत आहे.

25 एप्रिलपासून आरोग्य विभाग सुरू झाला. 27 एप्रिलपासून सर्व कार्यालये सुरू होणार. चार दिवस ठप्प असलेलं कामकाज आता पुन्हा सुरू होणार. आता कामकाज सुरू होणार असलं तरी... पेन्शनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे पुढे पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.