Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी बच्चू कडूंसह या नेत्याला उमेदवारी

एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी बच्चू कडूंसह या नेत्याला उमेदवारी

मुंबई : खरा पंचनामा 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि निलम गो-हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.

प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज शिवसेनेते प्रवेश केला, त्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार, १० पैकी २ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. तर ६ जागा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला आली आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या ६ नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निलम गोऱ्ह आणि बच्चू कडू थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करतील. १२ मे २०२६ रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल.

प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज धनुष्यबाण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केलाय. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच राहणार असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिंदेसेनेत जात असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलीय. तर शिंदेसेनेत प्रवेश करणार असलो तरी प्रहार संघटना कायम राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.