हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार
सोलापूर : खरा पंचनामा
वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान यांच्यामार्फत आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपक्रमशील शाळा पुरस्कार बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस देण्यात आला.
श्री बसवेश्वर महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान प्रांगण कुंभारवेस येथे १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, ६ शिक्षकेतर कर्मचारी व ४ शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी श्री राजू भूमकर, श्री संजीव बिद्री यांच्या उपस्थितीत व डॉ. विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे श्री राजशेखर विजापुरे, श्री लक्ष्मीकांत बिराजदार, श्री अनिल वजीरकर व मल्लेश पुरवंत यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेत राबविण्यात येणाऱ्या बुद्धिबळ, अबॅकस, प्रिसिजन फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, गायन, वादन, नृत्य, नाट्य इ. उपक्रमामुळे व जिल्हास्तरीय विविध वक्तृत्व, चित्रकला, समूहनृत्य, कराटे व राज्यस्तरीय युनिफाईड व नवी मुंबई येथे आयोजित एकांकिका स्पर्धेत यश संपादन केल्याने हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.