भोंदू अशोक खरात प्रकरणात थेट आयजीचा व्हिडीओ समोर
पोलीस दलात मोठी खळबळ
मुंबई : खरा पंचनामा
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची काल या प्रकरणात काही तास चौकशी झाली. रूपाली चाकणकर भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना दिसल्या.
यासोबतच काही फोटोही व्हायरल झाली. यानंतर रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच एनसीपीच्या राज्य महिला आयोग पदाचा राजीनामाही द्यावा लागला. खरात याच्या प्रकरणात राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांची नावे आल्याने खळबळ उडाली. अशोक खरात याने हजारोंच्या संख्येत महिलांवर लैगिंग अत्याचार केले. या प्रकरणातील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात खरातवर गुन्हे दाखल झाली. मात्र, ज्या तुलनेत त्याने महिलांवर अत्याचार केले, त्या तुलनेत महिला पुढे येत नाहीत. एसआयटी या प्रकरणात तपास करत आहे. काही वर्षात खरातने गडगंज मालमत्ता जमा केली.
अंजली दमानिया अशोक खरात प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी नुकताच ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली. अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर आणि फोटोनंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. यासोबतच नाशिकचे आयजी दत्ता कराळे चांगलेच अडचणीत येऊ शकतात.
अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळे यांचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला. भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे का गेले असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. भोंदू बाबाच्या कार्यक्रमात आयजी दत्ता कराळे यांनी भाषण देखील केल्याचा दावा करण्यात आला. दत्ता कराळे आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यात 18 कॉल असल्याचा अंजली दमानिया यांचा दावा आहे.
तब्बल 18 कॉल दोघांमध्ये झाल्याचे सांगितले जाते. नाशिकचे पोलीस आयजी दत्ता कराळे यांच्या चौकशीची अंजली दमानिया यांनी आता थेट मागणी केली आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रकरणात लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली. भोंदू अशोक खरात आणि नाशिक पोलिस IG यांच्यात नेमके काय संबंध आहेत, याची आता राज्यभरात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.