सांगली बुकीज् तर्फे आज वाचन उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजन
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'सांगली बुकीज्' या समूहाने आज, मंगळवार (दि. १४ एप्रिल) रोजी एका विशेष वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल" हा अत्यंत प्रेरणादायी विचार जनमानसात रुजवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
या विचाराने प्रेरित होऊन समाजातील वाचन संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन माई घाट, सांगली येथे केले असून वेळ सायंकाळी ६:०० वाजता आहे. या उपक्रमात सहभागी होणारे वाचक आपले आवडते पुस्तक सोबत आणू शकतात किंवा तेथे उपलब्ध असलेली पुस्तके देखील वाचू शकतात. 'सांगली बुकीज्'च्या वतीने सांगलीतील जास्तीत जास्त पुस्तकप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.