Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घुमणार परशुरामांचा जयघोषरविवारी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसाद

सांगलीत घुमणार परशुरामांचा जयघोष
रविवारी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसाद

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

भगवान परशुराम जयंतीनिमित्त येत्या रविवारी (१९ एप्रिल) सांगली जिल्ह्यात ब्राह्मण समाजाच्यावतीने भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातील समाज एकवटणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेली भव्य शोभायात्रा दुपारी ३:०० वाजता सांगलीच्या मुख्य गणपती मंदिरापासून सुरू होईल. शोभायात्रेत आकर्षक चित्ररथ, पारंपरिक वाद्ये आणि दुचाकी-चारचाकी वाहनांचा ताफा असणार आहे.

सायंकाळी ६:३० वाजता आयटी पार्क (विलिंग्डन कॉलेज जवळ) येथे जन्मकाळ सोहळा संपन्न होईल. सोहळ्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागींना भगवा शर्ट, टोपी किंवा भगवी साडी परिधान करण्याचे आवाहन समितीने केले आहे. ब्राह्मण समाजाच्या प्रगती आणि एकजुटीचा निर्धार करण्यासाठी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.