Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील हॉटेलमधील अन्नात आढळले झुरळअन्न सुरक्षा विभागाने तात्काळ कारवाई करावी : अॅड. विकास बा. पाटील-शिरगांवकर यांची मागणी

सांगलीतील हॉटेलमधील अन्नात आढळले झुरळ
अन्न सुरक्षा विभागाने तात्काळ कारवाई करावी : अॅड. विकास बा. पाटील-शिरगांवकर यांची मागणी

सांगली : खरा पंचनामा 

सांगली येथे असलेल्या हॉटेल ऑनेस्ट पर्ल येथे दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारच्या जेवणावेळी अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार घडला आहे. ऍड. विकास पाटील-शिरगांवकर यांच्या अन्नामध्ये मृत झुरळ आढळून आले. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचाच नाही, तर सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा आहे.
सदर घटनेमुळे संबंधित हॉटेल व्यवस्थापनाचा अन्न स्वच्छता व सुरक्षितते बाबतचा गंभीर निष्काळजीपणा स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे दूषित व असुरक्षित अन्न पुरविणे हे कायद्याने गुन्हा असून यावर कडक कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
या प्रकरणी Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत संबंधित हॉटेलवर तात्काळ कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित रद्द करण्यात यावा, तसेच दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार ऍड. पाटील-शिरगांवकर यांनी केली आहे.

याबाबत अन्न व औषध विभागाचे निरीक्षक रावसाहेब समुद्रे यांना विचारले असता, ऍड. पाटील-शिरगांवकर यांची तक्रार मिळाली असून येत्या काही दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे 'खरा पंचनामा'शी बोलताना सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.