Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून चरित्र्याच्या संशयावरून पतीचे कृत्य : हल्लेखोराचा शोध सुरु

विट्यात महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून 
चरित्र्याच्या संशयावरून पतीचे कृत्य : हल्लेखोराचा शोध सुरु 

विटा : खरा पंचनामा 

विट्यातील नेवरी रोड येथे चरित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी रॉड घालून महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेच्या पतीने हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित पतीचा शोध सुरु असल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
काजल अविनाश लोटके (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. अविनाश लोटके (वय 27) असे संशयित पतीचे नाव आहे. काजल ही मूळची मुंबई येथील आहे. तर अविनाश विट्याचा आहे. काही महिन्यांपूर्वी अविनाश आणि काजल यांचा प्रेम विवाह झाला होता. अविनाश हा विट्यातील एका गॅस एजन्सीत काम करत होता.

लग्नानंतर दोघेही विट्यातील नेवरी रोड परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. अविनाश काजलवर चरित्र्याच्या संशय घेत होता. यावरून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघेही विभक्त रहात होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची समजूत घातल्याने दोघेही विट्यातील भाड्याच्या घरात एकत्र रहात होते.

मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी आत पाहिले असता काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. याची माहिती मिळताच विटा पोलिसांसह एलसीबीचे पथक घटनास्थळी धावले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला.

काजलचा खून केल्यानंतर अविनाश पसार झाला आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. एलसीबी आणि विटा पोलिसांचे पथक संशयित पती अविनाशचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.