अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक
अमरावती : खरा पंचनामा
समाज माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणाला परतवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अयान अहमद असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर 'पोक्सो' सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आणि एका तरूणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालनी होती. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरूद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक तपासात पीडित मुली या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीरमदत दिली जाईल, तरी अशा प्रवृत्तींना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यलयातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेव नये आणि समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टला प्रतिसाद देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
समाज माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काल ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. दुसरीकडे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयात जाऊन आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे देखील उपस्थित होत्या. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावावी आणि पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा तायडे यांनी व्यक्त केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.