‘गावठी पिस्तूल’ खरेदी करायला गेला अन कंत्राटदार झाला जखमी?
'टेस्ट' करताना दोन गोळया सुटल्या : संशयितांचा शोध सुरु
सांगली : खरा पंचनामा
गावठी पिस्तुलची खरेदी करण्यासाठी गेलेला एक कंत्राटदार पिस्तूलाची चाचणी घेताना अचानक दोन गोळया सुटल्याने जखमी झाला. विश्रामबाग ते धामणी रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली. पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघे पळून गेले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. या घटनेमुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहराजवळील धामणी रस्त्यावरील एका चौकात एक कंत्राटदार आणि त्याचा एक मित्र गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी चारचाकी वाहनातून गेले होते. पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघे त्यांच्या वाहनात बसले. गाडीतच त्यांच्यात बोलणी सुरु होती. त्यावेळी पिस्तूलाची टेस्ट देण्याची मागणी झाली. त्यावेळी विक्रीसाठी आलेल्या एकाने पिस्तूल कॉक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिस्तूलातून दोन गोळया उडल्या.
यामध्ये कंत्राटदार जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांच्या शोधासाठी विविध ठिकाणी एलसीबीची पथके पाठवण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.