Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परीक्षेत्रातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : चौघांना मुदतवाढ अजय सिंदकर, जितेंद्र शहाणे पुन्हा येणार सांगलीत

कोल्हापूर परीक्षेत्रातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : चौघांना मुदतवाढ 
अजय सिंदकर, जितेंद्र शहाणे पुन्हा येणार सांगलीत 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या रविवारी प्रशासकीय आणि विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 12 अधिकाऱ्यांचा बदल्या झाल्या आहेत तर दोघांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत. चार अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापूर येथून निरीक्षक अजय सिंदकर आणि साताऱ्यातून जितेंद्र शहाणे हे दोन्ही अधिकारी पुन्हा सांगलीत परतले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत.

बदली झालेले अधिकारी :
अजय सिंदकर : कोल्हापुर ते सांगली
आण्णा पवार : पुणे ग्रमीण ते सातारा
हेमंतकुमार कुमारपाल शहा : सातारा ते कोल्हापुर
संदीप विलासराव जगताप : सातारा ते कोल्हापुर
महेश किसनराव इंगळे : कोल्हापूर ते सातारा
जितेंद्र प्रभाकर शहाणे : सातारा ते सांगली
शरद शंकरराव मेमाणे : कोल्हापूर विनंती अमान्य
दत्तात्रय सत्यवान देशमुख : कोल्हापूर ते सातारा
सतीश भाउसाहेब होडगर : कोल्हापूर विनंती अमान्य
अविनाश शंकरराव शिळीमकर : पुणे ग्रामीण ते सातारा
वंदना रजनीकांत श्रीसुदंर : सातारा ते पुणे ग्रामीण
अरूण रामचंद्र देवकर : सातारा ०१ वर्ष मुदतवाढ
मुकुंद वसंतराव कुलकर्णी : सांगली ०२ महिने मुदतवाढ
किरण नामदेव अवचर : पुणे ग्रामीण ०१ वर्ष मुदतवाढ
सुनिल सिताराम शेळके : सातारा ते कोल्हापुर
दादाभाऊ साहेबराव पवार : सातारा ते पुणे ग्रामीण
विजयसिंह भगवानसिंह चौहान : पुणे ग्रामीण ०१ वर्ष मुदतवाढ
महेश रामेश्वर स्वामी : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.