Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विश्वनाथ इंदिसे राज्य उत्पादन शुल्कचे अपर आयुक्त सुनिल चव्हाण यांना निवृत्ती दिवशीच पदोन्नती दिल्याने चर्चाना उधाण

विश्वनाथ इंदिसे राज्य उत्पादन शुल्कचे अपर आयुक्त 
सुनिल चव्हाण यांना निवृत्ती दिवशीच पदोन्नती दिल्याने चर्चाना उधाण 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन सह आयुक्तांना पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाचे उप सचिव रवींद्र औटे यांच्या सहीने रविवारी पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत.

सध्याचे सह आयुक्त विश्वनाथ इंदिसे यांची अपर आयुक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. श्री. इंदिसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात उप अधीक्षक या पदावर सेवेस प्रारंभ केला. त्यांनतर त्यांनी अधीक्षक, उप आयुक्त तसेच सह आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आज त्यांची अपर आयुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

चव्हाण यांना निवृत्तीदिवशी पदोन्नती दिल्याची चर्चा 
तर याच आदेशानुसार सह आयुक्त सुनिल चव्हाण यांचीही अपर आयुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. आजच श्री. चव्हाण सेवेतून निवृत्त होत आहेत. निवृत्ती दिवशीच चव्हाण यांना पदोन्नती दिल्याने हा राज्य उत्पादन शुल्क विभागात चर्चेचा विषय बनला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.