Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापुरात तिहेरी हत्याकांड!दीराने वहिनीला तलवारीने भोसकलं, 2 पुतण्यांनाही सोडलं नाही

सोलापुरात तिहेरी हत्याकांड!
दीराने वहिनीला तलवारीने भोसकलं, 2 पुतण्यांनाही सोडलं नाही

सोलापूर : खरा पंचनामा 

सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीवर शुक्रवारी रात्री तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. इथं दीराने आपल्या वहिनीची आणि तिच्या दोन मुलांची निघृणपणे हत्या केली आहे.

यामध्ये आई, मुलगी आणि १७ वर्षीय मुलाचा समावेश असून, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी दीराने एकेकाळी मदत केलेल्या वहिनीलाच निघृणपणे संपवलं आहे. या प्रकरणी आता सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के, त्याची पत्नी राणी, मुलगा धीरज, मुलगी दीक्षा, त्याचा मेहुणा सूरज मोरे आणि शेजारी वाघमारे नावाचा मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तर गायत्री सुधाकर मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका सुधाकर मस्के (२०) आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के (१७) असं हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत.

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील मस्के कुटुंब आपल्या शेतातील घरात वास्तव्यास होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गायत्री सुधाकर मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका सुधाकर मस्के (२०) आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के (१७) हे तिघेही रात्री घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. वस्तीवर इतर कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी गच्चीवर चढून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी १७ वर्षांच्या शिवराजने आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार केल्यानंतर, तो जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली खोलीच्या दिशेने पळाला. मात्र, निर्दयी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. तो खाली पोहोचताच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीने वर्मी घाव घालून त्यालाही संपवण्यात आलं.

या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सांगितलं की, मयत महिला आरोपीची वहिनी आहे. आरोपीला दोन भाऊ होते. पण दोघांचं निधन झालं आहे. हा एकटाच जिवंत आहे. या तिन्ही कुटुंबामध्ये वडीलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू होता. तसेच मयत वहिनीने आरोपीला २५ लाख रुपये हात उसणे दिले होते. मागील काही काळापासून वहिनीने याच पैशांसाठी आरोपीकडे तगादा लावला होता. याच कारणातून हा गुन्हा घडला असावा, असं प्रथमदर्शनी केलेल्या तपासातून दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुख्य आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली आहेत. घटनेचा तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.