Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा सर्जिकल स्ट्राईक सुरु!सांगलीकरांकडून व्हिजिबल पोलिसिंगचे स्वागत बस स्थानक, व्यापार पेठेच्या सरप्राईज व्हिजिटनंतर पुढचा नंबर कोणाचा?

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा सर्जिकल स्ट्राईक सुरु!
सांगलीकरांकडून व्हिजिबल पोलिसिंगचे स्वागत 
बस स्थानक, व्यापार पेठेच्या सरप्राईज व्हिजिटनंतर पुढचा नंबर कोणाचा?

सांगली : खरा पंचनामा 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा कार्यभार घेतल्यावर महिनाभराच्या आतच सर्जिकल स्ट्राईक सुरु केला आहे. शहरातील मुख्य बसस्थानक आणि गजबजलेल्या व्यापार पेठेला त्यांनी दिलेल्या सरप्राईज व्हिजिटने पोलीस अधिकारी, अंमलदारांचे धाबे दणाणले आहेत. स्वतः पोलीस अधीक्षकांनी व्हिजिबल पोलिसांचा परिपाठ घालून दिल्याने त्यांच्या या भूमिकेचे सांगलीकरांकडून स्वागत केले जात आहे. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा पदभार घेऊन अद्याप महिन्याचाही कालावधी झालेला नाही. वरिष्ठ अधिकारी, मंत्रालय आणि सचिव स्तरावरील सतत होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्समधून वेळ काढून त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रोज ते स्वतः तक्रारदारांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून भेटणाऱ्या नागरिकांच्या समस्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश ते देत असतात. त्यामुळे नागरिकांचे समाधान होत असून व्यस्त कामातूनही ते नागरिकांना वेळ देत असल्याचे सांगलीकरांना विशेष कौतुक आहे.

दैनंदिन कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय बैठका, विविध स्तरावरील 'व्हिसी', तक्रारदरांच्या भेटी यातून वेळ काढून त्यांनी सांगली शहरात गर्दीच्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट दिल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक मुख्य बसस्थानकाला भेट दिली. स्थानकाच्या कोपरा अन कोपऱ्याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. सुमारे अर्धा तास ते आणि त्यांचा अंगरक्षक स्थानक परिसरात फिरत होते. याची कल्पनाच संबंधित पोलीस ठाणे आणि स्थानकातील कर्तव्यावरील अंमलदाराला नव्हती. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी बाजारपेठेत होणारी गर्दी, पार्किंगची समस्या याबाबत त्यांनी काही व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी नियुक्त केलेले अंमलदार दिलेल्या पॉईंटवर आहेत की नाही याची खात्रीही केली. कर्तव्यावर नसलेल्यांची खरडपट्टीही काढली. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यातून अधिकारी आणि अंमलदारांना व्हिजिबल पोलिसिंगचा पाठ घालून दिला आहे. त्यांच्या या सरप्राईज व्हिजिटचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र त्यांचा पुढचा सर्जिकल स्ट्राईक कोठे असेल याची कोणालाच कल्पना नसल्याने जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी अलर्ट मोडवर असल्याचे दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.