Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कलमा पठण कुणी शिकवलं ? निदा खानची सलग 2 दिवस चौकशी मोठा खुलासा होणार, मालेगाव कनेक्शन उघड

कलमा पठण कुणी शिकवलं ? निदा खानची सलग 2 दिवस चौकशी 
मोठा खुलासा होणार, मालेगाव कनेक्शन उघड

नाशिक : खरा पंचनामा 

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS मधील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिची आज सलग दुसऱ्या दिवशी विशेष तपास पथकाकडून (SIT) कसून चौकशी करण्यात येत आहे. न्यायालयाने कालच निदा खानला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तपास यंत्रणांनी निदा खानवर पीडित महिलांना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलांना बुरखा घालण्यासाठी कोणी आणि कसे प्रवृत्त केले? बुरखा नेमका कुठून आणण्यात आला? पीडित महिलांना नमाज पठण आणि कलमा पठण करण्याचं प्रशिक्षण कुठे आणि कसं देण्यात आलं? अशा प्रश्नांचा तपास आता एसआयटीकडून केला जात आहे.

निदा खानच्या मोबाईल जप्तीनंतर तपासात एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. तिच्या मोबाईलमध्ये मालेगावमधील काही संशयास्पद लिंक आढळून आल्या आहेत. या लिंकचा वापर नेमका कशासाठी केला जात होता मालेगावातून तिला कोणी मदत करत होते का? याचा शोध आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला जात आहे.

निदा खान ही या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असल्याने तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कामाच्या वातावरणाचा वापर करून धर्मांतराचं जाळं कसं पसरवलं गेलं? यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि यामागे एखादी मोठी संघटना कार्यरत आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न SIT करत आहे. ११ तारखेपर्यंतच्या पोलीस कोठडीत निदा खान नेमकं काय खुलासे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

खरं तर, नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरण उघडकीस आल्यापासून निदा खान फरार होती. नाशिकमधून फरार झाल्यानंतर ती भिवंडी, मुंब्रा आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये वास्तव्याला आल्याची माहिती आहे. ती संभाजीनगरमध्ये ४ ते ५ दिवसांपासून वास्तव्याला होती. तिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांनाही अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.