सांगली जिल्ह्यात ८ मे जागतिक थॅलेसिमीया दिन झाला साजरा
समवेदना मेडिकल फौंडेशन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, सांगली सिव्हील रुग्णालय, NH हॉस्पीटल बेंगलोर, DKMS फौंडेशन बेंगलोर, सांगली जिल्हा ब्लड बँक असोसिएशन यांनी घेतला पुढाकार
सांगली : खरा पंचनामा
आपल्या देशात थॅलेसिमिया, सिकलसेल,ॲनिमीया, हिमोफिलीया यासारखे गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जन्माला येवून मरण यातना भोगत आहेत. अशा आजारांचे समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन झाले पाहिजे म्हणून ८ मे जागतिक थॅलेसिमीया दिन पाळला जातो.
या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात प्रथमच रैली काढण्यात आली. आणि यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना "निदान न झालेल्यांना शोधणे व दुर्लक्षित घटकानां आधार देणे” अशी होती. या कार्यक्रमाची सुरुवात सांगली सिव्हील रुग्णालय येथे जनजागृती रॅलीने झाली. या रॅलीस डॉ. प्रकाश गुरव (अधिष्ठाता), डॉ. विक्रमसिंह कदम सिव्हिल सर्जन, समवेदना मेडिकल फौंडेशनचे संस्थापक बर्कत पन्हाळकर, NH हॉस्पीटल विकी रॉय,मोहम्मद रिजवान, शिरगांवकर, वसंतदादा पाटील, शाश्वत, राजाराम बापू पाटील, अक्षय, MSI, आदर्श, सिध्दिविनायक, भारती विद्यापीठ, सांगली, मिरज गव्हर्नमेंट आदी ब्लड बँक व नर्सिंग स्टुडंट यांनी उपस्थिती दर्शविली.
एकच नारा थॅलेसिमिया आवरा, रक्तदान जीवनदान, नको भीती रक्ताची जीवन वाचवू रुग्णाची अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ही प्रभात फेरी सांगली सिव्हील येथुन सुरवात झाली काँग्रेस भवन, स्टेशन चौक, महापालिका, झुलेलाल चौक मार्गस्थ होवून सिव्हील रुग्णालय येथे समाप्त झाली.परत त्यानंतर हा कार्यक्रम मिरज मेडिकल कॉलेज येथील कुलकर्णी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम डॉ. दीपा फिरके ,बालरोग विभाग डॉ. हरीश तांबेकर, मोठ्या मुलांचे विभागीय डॉक्टर, सहाय्यक प्राध्यापक, बालरोग विभाग, फार्मा विभाग अमीन भोकरे तसेच समवेदना फाउंडेशनचे बरकत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
अधिष्ठाता डॉ. गुरव, मेडिकल सुपरिडेंट डॉ. रुपेश शिंदे, डॉ. राठी मॅडम यांचे सहकार्य लाभले. थॅलेसेमिया जनजागृती व रुग्णसेवा याविषयी डॉ. प्रियांका पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच डॉ. दीपा फिरके यांनी पालकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत थॅलेसेमियाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरभी पठ्ठणशेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्रुती यागलेवाड यांनी केले. तर बोन मॅरो ट्रान्स्प्लांटच्या विषयी NH हॉस्पीटल यांनी संवाद साधला, DKMS यांच्या कडून HLA टेस्ट फ्रि करण्यात आले. व सर्व रक्तपीढी आणि फौंडेशनमध्ये अहोरात्र काम करित असणारे पालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन फौंडेशनचे शबनम जमादार, रोहिणी राजदीप, राजरत्न राजदीप, समीर कांबळे, प्रेरणा नांगरे, बबन कांबळे, सलीम मुल्ला, राजु कांबळे, विकास माने, कपिल राजदीप, अजय डोरले, गणेश गंगाधर, केदारी भडकंभी, मिरज सिव्हीलचे समाजसेवक विभाग सुर्यप्रकाश राऊत, सांगली सिव्हील समाजसेवक खाडे यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे ८८ थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी विशेष मोफत ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णांची क्लिनिकल तपासणी तसेच नियमित तपासण्या (CBC, S. Ferritin, HIV, HBsAg, HCV, TFT, ECG) करण्यात आल्या. रुग्ण व पालकांना नियमित फॉलोअप व उपचारांचे महत्त्व याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच रुग्णांची HLA तपासणी व पालकांची HPLC तपासणी करण्यात आली. रुग्णांना Cardiac MRI साठी अपॉइंटमेंट देण्यात आल्या तसेच नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्याच बरोबर लहान मुलांना भेट वस्तु देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी बालरोग, मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी व पॅथॉलॉजी विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच फार्माकॉलॉजी विभागामार्फत रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. रुग्ण, पालक, आरोग्य कर्मचारी व आयोजक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.