Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पेटलाभाजपच्या 5 कार्यकर्त्यांवर बॉम्ब हल्ले, पानीहाटीमधील धक्कादायक प्रकार

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पेटला
भाजपच्या 5 कार्यकर्त्यांवर बॉम्ब हल्ले, पानीहाटीमधील धक्कादायक प्रकार

कोलकाता : खरा पंचनामा 

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून दररोज हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने टोकं गाठलं.

विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या भाजपा सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांचा पीए चंद्रनाथ रथ यांची बंगालमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर आणखीन एक घटना समोर आली असून यात अज्ञातांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात भाजपचे 5 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

विधानसभेच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या उत्तर परगना जिल्ह्यातील पानीहाटी परिसरात भाजप कार्यकर्त्यांवर देशी बॉम्ब फेकून हल्ले करण्यात आले. या घटनेत जवळपास ५ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा पश्चिम बंगालमधील वातावरण बिघडलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बॉम्ब हल्ल्याची घटना रात्री पानीहाटी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये दत्ता रोड परिसरात घडली.

गुरुवारी रात्री काही भाजप कार्यकर्ते सर्वसामान्यांसोबत बातचीत करत होते, यावेळी अचानक चार जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या अज्ञात आरोपींनी भाजप कार्यकर्त्यांवर तीन बॉम्ब फेकले आणि हल्ला केल्यावर ते पळून गेले. यात भाजपचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. जखमी भाजप कार्यकर्त्यांना उपचारांसाठी लगेचच आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून माहिती मिळाल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही परिसरात तैनात करण्यात आले असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीचा तपास केला जात असून आरोपींचा शोध घेतला जातोय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.