Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवघ्या 500 रुपयांचा विमानप्रवास भोवला!सायबर पोलीस निरीक्षकांसह 9 अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अवघ्या 500 रुपयांचा विमानप्रवास भोवला!
सायबर पोलीस निरीक्षकांसह 9 अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

नागपूर : खरा पंचनामा 

नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये अवघ्या पाचशे रुपयांच्या तक्रारी संदर्भात झालेल्या एका वादग्रस्त कारवाई संदर्भात मोठीबातमीसमोर आली आहे. याप्रकरणाच्या तपासा अंती तब्बल 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह नागपूर  शहारत एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 16 महिन्यात नागपूरकरांच्या फसवणुकीचे 120 प्रकरण प्रलंबित असताना, तसेचयाप्रकारणांमध्ये नागपूरकरांचे 58 कोटी रुपये अडकले असताना, सायबर पोलीस स्टेशनच्या एका पथकाने त्या प्रकरणाकडे लक्ष न घालता अवघ्या पाचशे रुपयांच्या फसवणुकीच्या एका कथित प्रकरणात विमानाने मुंबई आणि पुणेगाठत रेड केली होती. त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होऊन ती कारवाई ही थंड बस्त्यात टाकण्यात आल्याचा आरोप झाला होता. पाचशे रुपयांच्या तक्रारीसाठीची आणि नंतर थंड बसतात टाकण्यात आलेली ती रेड आणि त्याची माहिती काही पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली, या मुद्द्यावरून सायबर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल ठाकरे यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी पोलीस कर्मचारी प्रफुल्ल ठाकरेचा मोबाईल हिसकावून घेतल्याचाही आरोप झाला होता.

दरम्यान, याप्रकारानंतर प्रफुल्ल ठाकरे जवळपास 36 तास बेपत्ता झाले होते. यावर एबीपी माझाने हाणामारीनंतर पोलीस कर्मचारी बेपत्ता असून कुटुंबीयांनी तक्रार अशी बातमी 25 एप्रिलला दाखवली होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली होती. अशातच चौकशीअंती याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाणामारीचा आरोप लागलेले सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल ठाकरे यांच्यासह इतर पाच पोलीस कर्मचारी अशा एकूण नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

सायबर पोलीस स्टेशनचा चार्ज ज्या दोन डीसीपींकडे होता. तो चार्ज ही काढून नवे डीसीपी दीपक अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.