Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खंडणीखोर तीन पोलीसांना अमितेश कुमार यांनी केलं बडतर्फ

खंडणीखोर तीन पोलीसांना अमितेश कुमार यांनी केलं बडतर्फ

पुणे : खरा पंचनामा 

पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरणात आता मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. खंडणीप्रकरणी नाव आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फ केलं आहे. यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे.

गुन्हेगारांवर वचक बसवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांनीच चक्क खंडणीखोरीचा मार्ग पत्करल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीसांना अखेर बडतर्फ करण्यात आले आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत. सोनाली हिंगे प्रसिद्ध रील स्टार देखील आहेत.

पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला या तिघांनी संगनमताने जाळ्यात ओढले. तुमच्यावर 'पॉक्सो' (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. पोलीस असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची प्रचंड दहशत निर्माण केली आणि प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने पीडित प्राचार्यांनी ही रक्कम या पोलिसांना दिली. मात्र, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.