नागज फाट्यावरून अपहरण केलेल्या दुहेरी खुनातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू
कर्नाटकातील मदभावीत शेतात लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खुनातील साक्षीदाराचेच जबाबासाठी फिर्यादीसोबत जाण्यापूर्वीच अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी ही घटना घडली होती. आज बुधवारी त्याचा मृतदेह कर्नाटकातील मदभावी येथे झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खुनामागचे कारणाचा शोध घेत असून आरोपीच्या मागावर पोलिस आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
दादासो नामदेव यमगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज कर्नाटक राज्यातील अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदभावी गावातील शेतात दादासो यमगर यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे . मृतदेहाशेजारी दादासो यमगर यांची दुचाकीही आढळून आली आहे.
दादासो यमगर हे जत तालुक्यातील कोसारी मध्ये जुलै 2023 मध्ये घडलेल्या दुहेरी खुनातील साक्षीदार होते. त्यांचे काल कवठेमहंकाळ तालुक्यातील नागज फाटा येथून अपहरण करण्यात आले होते.
मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू असून या खुनामागचे कारणाचा शोध घेत असून आरोपीच्या मागावर पोलिस आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.