पोलीस असल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट भीती घालून 59 लाखांना लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक
सांगली सायबर पोलीस ठाण्याची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पोलीस असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तासगाव येथील एकाला 59.09 लाखाला लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, सिम कार्ड, डेबिट कार्ड, पासबुक, चेकबुक जप्त करण्यात आली आहेत. सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
अबु हुसेन समसुल आलम (वय ३८, रा. हिंगे आडुनशिप, काळेपडळ रोड, हडपसर, पुणे मुळ रा. बादुवा ता. बुरवान, जिल्हा मुरशीबाद, पंश्चिम बंगाल), सुशील अकील राम (वय ३४, रा. ३ फ्लोरा, सिझन मॉल, आमनोरा मॉल समोर, मगरपट्टा सिटी, पुणे मुळ रा. पंश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सावळज येथील अण्णासाहेब पाटील यांना दि. 8 ते 16 जानेवारी दरम्यान फोन करुन आपण पोलीस, सी बी आय, इन्कम टॅक्स, किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ट पोलीस अधिकारी असल्याचे भासवले व तक्रारदार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने आपल्या व्हाट्सअॅप प्रोफाईला पोलीस अधिका-यांचे फोटो लावुन व्हाट्सअॅप वर व्हिडीओ कॉल करुन अटक करण्याची धमकी देऊन एकुण ५९ लाख ९ हजार रुपयांची फसवणुक केली होती. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगलीच्या सायबर पोलिसांनी याचा तपास केल्यावर आरोपीच्या खात्यावर 24 लाख 60 हजारांची रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घर झडतीमध्ये ४ मोबाईल, विवीध बँकेचे एकुण १८ डेबीट/क्रेडीट कार्ड, विवीध बँकांचे २४ चेक बुक, विवीध बँकांचे ६ पासबुक, ६ सीम कार्ड, ६ रिकामे पाकीट, ३ अधार/पॅन कार्ड, असा मुद्देमाल सापडला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्नेहा गिरी, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, सतिश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रूपाली पवार, सलमा इनामदार, कॅप्टन गुंडवाड, विजय पाटणकर, अजय बेंदरे, विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरी, शांतव्वा कोळी, दिपाली नेटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.