Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

म्हैसाळमधील बेकायदेशीर डान्स बार उध्वस्त मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई पहा व्हिडीओ

म्हैसाळमधील बेकायदेशीर डान्स बार उध्वस्त 
मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई 
पहा व्हिडीओ 

मिरज : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील राही पॅलेस या आलिशान बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या पथकाने छापा टाकून तेथे बेकायदेशीररित्या सुरू असलेला डान्स बारवर कारवाई करून तो उध्वस्त करण्यात आला. या कारवाईत पाच तरुणींना तसेच चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


बेकायदेशीर डान्सबार प्रकरणी मॅनेजर स्वप्नील राजकुमार कोरे (वय 32, रा. उदगाव), अमित सुरेश गोरड, (वय 30, रा. नांगोळे, कवठेमहांकाळ), बापू आबासो मासाळ (वय 25, रा. नांगोळे कवठेमहांकाळ), मिथुन शंकर कोळेकर (वय 31, रा. रांजनी कवठेमहांकाळ) आणि चंद्रकांत नेताजी माने (वय 39, रा. रांजनी कवठेमहांकाळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मिरज-म्हैसाळ रस्त्यावर असणाऱ्या राही पॅलेस बार मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील काही महिला नृत्य करण्यासाठी येत असल्याच्या तक्रारी होत्या. सोमवारी रात्री नऊ वाजता मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी बारमध्ये डान्स करताना आढळल्या. याशिवाय तेथे दारूच्या नशेत असणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जवळपास दोन लाख सहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत पाच तरुणीं,चार ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अश्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी बेकायदेशीर डान्सबार सुरू असताना मिरज ग्रामीण पोलिसांनी यांची काही माहिती नसल्याने मिरज ग्रामीण पोलिसांच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त होत आहे. या बारवर मिरज उपविभागातील अन्य कोणाचा वरदहस्त होता का याची सखोल चौकशी पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.