छातीवर गंभीर वळ, नराधमाने क्रूरतेची सीमा ओलांडली !
नसरापूर अत्याचार प्रकरण
नसरापूर : खरा पंचनामा
पुण्यातील नसरापूर परिसरात एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने माणुसकीला काळीमा फासला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीचा किती निर्दयीपणे छळ केला, याचा खुलासा आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम भीमराव कांबळे याने चिमुरडीवर अत्याचार करताना ती ओरडू नये आणि तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. तिला निर्दयीपणे मारहाण देखील केली. हा खुलासा समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या निष्पाप मुलीने शेवटच्या क्षणापर्यंत जो संघर्ष केला, त्याचे पुरावे तिच्या शरीरावर आढळून आले आहेत.
शवविच्छेदन अहवालात चिमुरडीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. विशेषतः तिच्या छातीवर गंभीर वळ आढळून आले आहेत. यावरून आरोपीने तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे. चिमुरडीचा मृत्यू नेमका गुदमरून झाला की आणखीशवविच्छेदन अहवालात चिमुरडीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. विशेषतः तिच्या छातीवर गंभीर वळ आढळून आले आहेत. यावरून आरोपीने तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे. चिमुरडीचा मृत्यू नेमका गुदमरून झाला की आणखी काही अन्य कारण आहे? हे शोधण्यासाठी तिचे व्हिसेरा (अंतर्गत अवयवांचे नमुने) राखून ठेवण्यात आले आहेत.
या घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पुण्यातील ससून हॉस्पिटलने शवविच्छेदन करण्याची संपूर्ण प्रक्रिया 'इन कॅमेरा' म्हणजेच व्हिडीओ रेकॉर्डिंगसह पार पाडली आहे. या माध्यमातून प्रकरणातील तांत्रिक पुरावे भक्कम करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सध्या या नराधमाविरोधात कडक कारवाईची मागणी होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काही अन्य कारण आहे? हे शोधण्यासाठी तिचे व्हिसेरा (अंतर्गत अवयवांचे नमुने) राखून ठेवण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.