Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत हद्दपार गुन्हेगारांसह पाच जणांना अटकआलिशान कारसह कोयता जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

मिरजेत हद्दपार गुन्हेगारांसह पाच जणांना अटक
आलिशान कारसह कोयता जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरज शहरात दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. गोपनीय माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी आलिशान कार अडवत ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हद्दपार व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.
इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख (रा. अमन नगर मिरज), सौरभ कोळेकर (रा. दत्त कॉलनी मिरज), शंकर फुले (रा.म्हैशाळ रोड मिरज), बद्रुद्दीन दर्यावर्दी (रा. अमननगर मिरज), समीर शेख (रा.अमन नगर मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आलिशान कारची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी कोयता सापडला. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, अभिजीत धनगर, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे,  विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रामकृष्ण सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.