Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बोगस धनादेश प्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

बोगस धनादेश प्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

सांगली : खरा पंचनामा 

बोगस धनादेश देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी अमोल रावसाहेब सकळे (रा. नांद्रे) यांना सहा महिने साधीकैद व फिर्यादिस नुकसान भरपाई म्हणून २५०००० रुपये देण्याचा आदेश सांगली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही खुलपे यांनी पारित केला. तसेच आरोपी यांच्या विरुध्द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ४५८ (२) प्रमाणे जेल वारंट काढण्याचा आदेश दिला.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगलीच्या शाखा नांद्रे ता. मिरज मधून अमोल रावसाहेब सकळे यांनी कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी वारंवार संस्थेकडून तगादा लावला असता वरील कर्जदार यांनी कर्ज रकमेपोटी संस्थेस १,८१,०९९ रुपयांचा चेक दिला होता. संस्थेने सदर चेक बँकेत भरला असता न वटता परत आला.

या प्रकरणी त्यांच्या विरोधात सांगली येथील न्यायालयात खटला दाखल करणेत आला होता. त्याची सुनावणी होऊन अमोल रावसाहेब सकळे यांना वरील प्रमाणे शिक्षा झाली. नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने अॅड. जे.एन. चौगुले यांनी काम पाहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.